HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर तिसरी लाट दूरच दुसरीच उलटेल, उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई।कोरोना महामारी ने संपूर्ण लॉकडाऊन झालं होतं त्यांनतर पुन्हा कोरोनाची लाट ओसरत असताना सर्व काही पूर्वपदावर येत असताना पुन्हा डेल्टा प्लस ने पाय पसरवायला सुरवात केली मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल कोणालाही काहीच कल्पना नव्हती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनही तयार नव्हतं. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे त्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र वाढलेल्या गर्दीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण सर्वानीच यशस्वीपणे मात केली आहे मात्र अद्यापही कोरोनाची दुसरी लाट पुर्णपणे संपली नाही. आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट कधी येईल हे काही सांगता येत नाही, परंतू आताची गर्दी बघता हीच लाट पुन्हा उलटेल का?, हा मोठा धोका आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मालाड येथील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

“कलानगराला लागूनच एमएमआरडीएचा रस्ता झाला. त्यावर उड्डाणपूल झाला. मग धारावीचा रस्ता झाला. जिथे मोजक्याच गाड्या दिसत होत्या तिथंही आज वाहतूक कोंडी होत आहे. रहदारी वाढत असल्याने ट्राफिक वाढत चाललं आहे. त्यावर आज तोडगा काढला आहे. एमएमआरडीएचं कार्यालयं झालं, तिथं त्याचा फायदा झाला म्हणून ट्राफिक जाम होणाऱ्या ठिकाणी एमएमआरडीएची कार्यालये सुरू करायची का?, असं मिश्कील भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. विस्तारत चाललेल्या मुंबईसाठी मार्ग काढले जात आहे, याबद्दल मी एमएमआरडीएचं मुंबईकरांच्या वतीने कौतुक करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा, परिपत्रकातील निकषांवर सर्व स्तरांतून टीका

News Desk

गंगापूर साखर कारखाना प्रकरणी भाजप आमदाराच्या अडचणीत पुन्हा वाढ

News Desk

रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही !

swarit