HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांच्या गाठीभेठी सुरु, उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांच्या भेटीला

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज (२८ जून) पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट होत आहे. शनिवारीही संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुसऱ्यांदा राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर संजय राऊत थेट सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे लागोपाठ या दोन नेत्यांच्या भेटी नेमकी का घेतल्या याची चर्चा सुरु झाली आहे.

राऊतांकडून शनिवारीही मुख्यमंत्र्यांची भेट

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. प्रताप सरनाईकांशी दोन दिवसांपूर्वी फोनवरुन बोललो, त्यांनी खुलासा केला, मी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्या व्यक्त करत असताना सरनाईकांनी स्पष्टपणे सांगितलं मी आजन्म शिवसेनेतच राहीन, आणि शिवसेनेतच मरेन. प्रताप सरनाईकांबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असं राऊत यांनी म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध! – मुख्यमंत्री

Aprna

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

News Desk

महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये, सामनातून टीका

News Desk