HW News Marathi
महाराष्ट्र

Tauktae Cyclone | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील नुकसानाची करणार पाहणी

मुंबई | रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२१ मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत. या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावाही घेणार आहेत. दरम्यान, यावेळी ते कोणती मदत जाहीर करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा?

  1. सकाळी 8.35 वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन
  2. सकाळी 08.40 वाजता – “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
  3. सकाळी 9.40 वाजता – हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण
  4. सकाळी 10.10 वाजता – वायरी, ता.मालवण येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
  5. सकाळी 10.25 वाजता – मोटारीने मालवण येथे आगमन व “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
  6. सकाळी 11.05 वाजता – निवती, ता. वेंगुर्ला येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
  7. सकाळी 11.30 वाजता – चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
  8. चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण
  9. दुपारी 12.35 वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण

देवेंद्र फडणवीस यांचाही कोकण दौरा

विरोधी पक्षनेते आणि मजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस बुधवार रायगड, गुरुवार रत्नागिरी, तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहेत. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शहांचा डाव संजय राऊत मुंबईतच अडवणार!

News Desk

शरद पवार साहेब आधारवड ! भाजपच्या नेत्याच्या ट्विटची चर्चा !

News Desk

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात झाली कागदपत्रांची फेकाफेकी…!

News Desk