HW News Marathi
देश / विदेश

सत्तेत एकत्र नाही याचा अर्थ आमचं नात तुटलं असे होत नाही – उद्धव ठाकरे  

नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणसह राज्‍यातील विविध मुद्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. मात्र, यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान माेदी यांची व्यक्तिगत भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींशी चर्चा झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर भाष्य केले आहे. मराठा आरक्षणासह राज्‍यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते.

दरम्यान, या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोंदीची वैयक्तिक भेट घेतली असल्याचे समोर आले. पंतप्रधानांसोबत ठाकरेंची ३० मिनिटं वैयक्तिक चर्चा झाली असल्याची माहिती देखील समोर आली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे पूर्वीपासून मैत्रीचे नातं आहे. सत्तेत एकत्र नाही याचा अर्थ आमचं नात तुटलं असे होत नाही. असे सांगत मी त्यांची व्यक्तिगत भेट घेतल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिगत भेट घेतल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीती निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. सुमारे दीड तास चार नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. त्यानंतर महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भेटीबाबत सविस्तर माहिती दिली. “राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधानी आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल,” असं मुख्यमंत्री म्हणाले

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2007 Hyderabad Twin Blasts Case | एनआयए स्पेशल कोर्टाने आरोपींना ठरवले दोषी

News Desk

“निवडणूक जवळ येताच CBI आणि ED कारवाई करते,” राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

Aprna

वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

News Desk