HW News Marathi
महाराष्ट्र

रामभक्तांना भूमिपूजन कसे पाहता येणार? मुख्यमंत्र्यांनी सुचवला पर्याय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आजचा (२६ जुलै) दुसरा भाग प्रसिद्ध झाला. यात त्यांनी आघाडीचे तीन चाकी सरकार, बुलेट ट्रेनचा विषय, कोरोनाची स्थिती, तसेच अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन या अनेक विषयांवर भाष्य केले.राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री जाणार का ? हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

यावर “कोरोनाचे संकट असलं तरी मुख्यमंत्री म्हणून राम मंदिराच्या भूमिपूजनाला मी जाऊन येईलही. मुद्दा तो नाही. पण राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी इतक्या वर्षांपासून जे रामभक्त वाट पाहत आहेत. ज्यांची या सोहळ्याला उपस्थित राहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ज्यांच्यासाठी हा सर्वोच्च आनंदोत्सव आहे, त्या लाखो रामभक्तांचे काय करणार? त्यांच्या भावनेचे काय करणार?, देशात कोरोनामुळे मंदिरांमध्ये जाण्यास सर्वसामान्यांना बंदी घातलेली आहे. मग तुम्ही राम मंदिराचं ई-भूमिपूजन करू शकत नाहीत का?, असा परखड सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

पुढे ते असेही म्हणाले की, “अयोध्येतील राम मंदिर हे काही सर्वसामान्य मंदिर नाही. या मंदिराला लढ्याची पार्श्वभूमी आहे. इतिहास आहे. हा जागतिक कुतुहुलाचा विषयही आहे. रामभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अनेक वर्षांपासून ते या क्षणाची वाट पाहत होते. लाखो राम भक्तांना राम मंदिराच्या भूमिपूजनाला येऊ देणार की अडवणार? कि कळत न कळत त्यांच्यात कोरोनाचा प्रसार होऊ देणार? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे”, बाळा नांदगावकरांची राजू पाटील यांच्यासाठी फेसबूक पोस्ट

News Desk

दरवाढीचा सपाटा कायम; 35 पैशांनी महागलं पेट्रोल-डिझेल

News Desk

‘चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न’, तर पंकजांचा धनंजय मुंडेंवर घणाघात!

News Desk