HW News Marathi
महाराष्ट्र

महेश कोठेंची शिवसेनेतून हकालपट्टी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार कारवाई

सोलापूर | शिवसेना नगरसेवक महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केल्याची माहिती, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली आहे.महेश कोठे हे आज (८ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र महाविकास आघाडीत कुरबूर नको म्हणून त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं वृत्त होतं. त्यानंतर लगेचच कोठे यांची हकालपट्टी केल्याची माहिती पुरुषोत्तम बरडे यांनी दिली आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर पडला आहे. त्यातच कोठे यांची शिवसेनेतून कायम हकालपट्टी करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी शुक्रवारी जाहीर केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच याबाबतचे आदेश दिल्याचे बरडे म्हणाले.

महेश कोठे यांनी गुरुवारी शिवसेना सोडल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आणि त्यांेचे समर्थक गुरुवारी रात्रीच मुंबईत पोहाचले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होईल, असे कोठे समर्थकांकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. या राजकारणाचे पडसाद उमटले आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत कोठे यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यावेळीही कोठे यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कोठे पुन्हा सेनेत सक्रिय झाले होते. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.

महेश कोठे यांची माहिती

महेश कोठे हे सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक आहेत. कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम नियोजित होता. मात्र महाविकास आघाडी करुन सत्तेत आलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष फोडाफोडी टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्तेत एकत्र असताना मित्रपक्षातील नेते फोडणे हे आघाडीला धोकादायक असल्याचं वरिष्ठांचं म्हणणं आहे. त्याचीच प्रचिती पारनेर नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे समोर आला होता.

अहमदनगरच्या पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. तेव्हादेखील अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. तेव्हा उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते. यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अजित पवार यांना फोन करून निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना धाडला होता. अखेर या बंडखोर नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर येऊन हातात पुन्हा शिवबंधन बांधले होते.

त्यानंतर महेश कोठेंसारखे सोलापुरातील बडे नेते खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल होणार होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर महेश कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर पडल्यामुळे, महाविकास आघाडीतील कुरबूर तूर्तास लांबणीवर पडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तो गाल सोडला अन् ओम पुरीचा गाल पकडला! – गुलाबराव पाटील

Aprna

भाजप आमदाराने घेतले नियम डावलून व्हीआयपी दर्शन

News Desk

विरोधी पक्षातील आमदारांचा आज भाजप प्रवेश

News Desk