HW News Marathi
Covid-19

पक्ष वाढवा कोरोना नाही, मुख्यमंत्र्यांची सर्व राजकीय पक्षांना तंबी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२१ फेब्रुवारी) जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन संवाद साधला. राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. याच मुद्द्यावर काल त्यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोना नियम पाळले जात नसल्यानं कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याला सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकारणीदेखील जबाबदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजकारण्यांना चांगलीच तंबी दिली आहे.

पक्ष वाढवा, कोरोना नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांना खडसावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, पण कोरोना नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनीही नियम पाळावेत. सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलन काही दिवस टाळा. लवकरच शासकीय कार्यक्रम झूमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसेच लॉकडाऊन लागणार की नाही हे तुमच्या हातात आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी 8 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

लोक आता मास्क घालत नाहीत. पहिली सॅनिटायझरची बाटली प्रत्येकाकडे असायची आता नाही. त्यामुळे आता आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी राबवली आता मी जबाबदार ही मोहीम राबवायची आहे. मी जबाबदार म्हणजे मी मास्क घालणार, हात धुणार, सॅनिटाझर वापरणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोव्हेंबरपर्यंत देशातील ८० कोटी गरिबांना मिळणार मोफत धान्य | नरेंद्र मोदी

News Desk

Dr. Avinash Bhondwe HW Exclusive : डॉक्टरांवर हल्ले का होत आहेत ?

News Desk

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

News Desk