HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला, खातेवाटपावर चर्चा

मुंबई। सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात महाविकासआडीचे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यापूर्वी सत्ता स्थापनेआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (२२ नोव्हेबर) भेट ठरली होती. मात्र, उद्धव ठाकरे काल (२१ नोव्हेंबर) रात्री ११.२० वाजता शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक घेण्यात आली होती. या दोघांमधील ही बैठक रात्री १२.१५ वाजता संपली.  या बैठकीमध्ये नेमके काय घडले, अद्याप समजू शकले नाही.  या बैठकीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेचा निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या या बैठकीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही उपस्थितीत होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे  दोघे देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या या बैठकीनंतर काल रात्रीच सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाला असून मुख्यमंत्री, मंत्रिपद, महत्त्वाची खाती, महामंडळे यावर चर्चा सुरू असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्रात महाविकासआडीचे आज किंवा उद्या राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा स्थापव करण्याची शक्यात वर्तवली जाते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कालपासून दिल्लीत लागोपाठ बैठका झाल्या. आज मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होईल, त्यामुळे सत्तास्थापनेसंबंधीची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे बोलले जात आहे. आज संध्याकाळी ४ वाजता काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांची निवडदेखील केली जाणार आहे.

 

 

Related posts

पक्षाप्रमाणे खातेवाटप झाले, उद्या किंवा परवा जाहीर करू !

News Desk

ईव्हीएम हटवल्याशिवाय विधानसभा होऊ देणार नाही !

News Desk

भीम आर्मीची उद्या अमरावतीमध्ये सभा

News Desk