HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं

नवी दिल्ली | शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई महानगर पालिकेने कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर कारवाई केली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली. पालिकेच्या कारवाईनंतर आता राजकारणही तापू लागलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री कंगना हिच्या कार्यालयावर जी कारवाई काल मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आली त्यानंतर भाजपाने थेट कंगनाची बाजू घेत शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख घटिया असा केला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासातील उद्धव ठाकरे हे सर्वात अपयशी मुख्यमंत्री आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुलची सभा संपताच मंडप कोसळला

News Desk

औरंगाबादेतील दंगलीत पोलिस कार्यकर्त्यांसारखे वागले | धनंजय मुंडे

News Desk

चिपळूण येथील मृत कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर

Aprna