HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदुत्वाची शिकवण देणारे बाबरी मशिदीच्यावेळी कोणत्या बिळात लपले होते?

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन दसरा मेळावा साजरा केला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा करणाऱ्यांनी गोव्यात हा कायदा का केला नाही? असा सवाल करतानाच आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये. इकडे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता, असं आमचं हिंदुत्व नाही, असा घणाघाती हल्ला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजवर चढवला आहे.

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला संबोधित करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आम्हाला कुणीही हिंदुत्व शिकवू नये. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तुमच्यासारखं सोयीचं हिंदुत्व आम्ही मिरवत नाही, असा टोलाही त्यांनी लागवला.

बाबरी मशीद पडली तेव्हा महाराष्ट्रात आगडोंब उसळल्यावर फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पुढे आली. त्यामुळे हा महाराष्ट्र वाचला. त्यावेळी आज हिंदुत्वाची शिकवण देणारे कुठे होते? कोणत्या बिळात हे लोक शेपूट घालून बसले होते, असा सवाल त्यांनी केला आहे.

मला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारले जात आहे. मंदिर उघडत नाही म्हणून मला हे प्रश्न विचारले जात आहेत. याद राखा, वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर फटका मारणारच. तुम्हाला जर फटका मारून घ्यायचाच असेल तर जरूर या, असं आव्हान देतानाच बाबरी पडली तेव्हा कुठल्या बिळात शेपट्या घालून पडले होते? ज्यांचं नाव कुणालाही माहीत नव्हतं ते लोक मला हिंदुत्वाबाबत विचारत आहे, असं सांगतानाच कोरोना आला की घंटा बडवा, थाळ्या वाजवा हेच तुमचं हिंदुत्व. इकडे गाय म्हणते माता आणि पलिकडे जाऊन खाता हेच का तुमचं हिंदुत्व?, असे टोलेही त्यांनी लगावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्याची माहिती CBIकडे गेली तर सर्व बाहेर येईल – किरीट सोमय्या

News Desk

सरकारनं सात-बारा कोरा करण्याचा शब्द पाळला नाही – विखे पाटील

News Desk

चवदार तळे ऊर्जा स्रोतच! – जितेंद्र आव्हाड

Aprna