HW News Marathi
महाराष्ट्र

बेडूक आणि त्यांची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात जातात, मुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंवर निशाणा

मुंबई | आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या निमित्त भाषण केले. अनेक दिवसांपासून राज्य सरकार व शिवसेनेवर टीका करत असलेल्या भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरपुस शब्दात समाचार घेतला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी करत उत्तर दिले आहे.

”प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, मेळावा हा टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या कोरोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्यांची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात जातात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज नाही,” अशी टीका ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर केली आहे.

राज्यपालांनाही टोला

मंदिरं खुली करण्यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्वावरून डिवचलं होतं. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी उत्तर दिलं होतं. त्यानंतर दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत टोला लगावला. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूध आंदोलन म्हणजे पुतण्या- मावशीचं प्रेम आहे ,राजू शेट्टी यांचा भाजपला टोला

News Desk

वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री!

News Desk

चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना, बोईंग ७३७ विमान कोसळले

Aprna