HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला, मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेची हाक

मुंबई | मुंबईत आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका अनेक ठिकाणी बसला. या चक्रीवादळाचा फटका वसईतल्या वृद्धाश्रमालाही बसला आहे. 17 मे रोजी झालेल्या चक्रीवादळात या वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले. यात न्यू लाइफ फाऊंडेशनच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचं पॅनेल कोसळून एक ज्येष्ठ नागरिक जखमीही झाला.

या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे शिक्षकही आहेत. त्यापैकीच एका शिक्षकानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वृद्धाश्रम व्यवस्थित करण्याची विनंती केली आहे. या चक्रीवादळात वृद्धाश्रमाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे या वृद्धाश्रमातील वृद्धांना जगणं मुश्किल झालं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांनी वृद्धाश्रमाचं काम करावं अशी विनंती केली आहे. 88 वर्षांच्या सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या शाळेतून 1991 साली निवृत्त झाल्या. त्या मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय शिकावायचे. राजेश आणि सरिता मोरु हे वृद्धाश्रम चालवतात. या पावसात वृद्धाश्रमतील वृद्धांचे बेड्स भिजले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना नीट झोपता ही येत नाही.

“उद्धव मी तुला शिकवलंय”

“या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालं. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर”, असं शिक्षिका सुमन म्हणाल्या आहेत.

सध्याचं कोरोनाचं संकट, त्यात वादळाचा तडाखा आणि वृद्धाश्रमाचं झालेलं नुकसान, अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग राहू द्या, निदान झोपण्यासाठी तरी जागा मिळू द्या, अशी अवस्था इथल्या वृद्धांची झाली आहे. त्यामुळेच या 90 वर्षीय शिक्षिकेने आपल्या ‘यशस्वी’ विद्यार्थ्यांकडे मदतीची याचना केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीस आपल्या गाण्याच्या माध्यमातून येणार पुन्हा भेटीला!

News Desk

सगळ्यांनी फिल्डवर जायची गरज नसते, शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

News Desk

दंगल सदृश्य परिस्थितीचा देवेंद्र फडणविसांकडून निषेध तर सरकारला आवाहन!

News Desk