HW News Marathi
महाराष्ट्र

लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणाऱ्यातला मी नाही – मुख्यमंत्री

उस्मानाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२१ ऑक्टोबर) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी काही महत्वाचे मुद्दे मांडले. शेतकरी संकटात आहे, अनेकांची घरे-दारे वाहून गेली आहेत. अतिवृष्टी होत असताना थोड्या थोड्या वेळाने माहिती शासनाकडे येत असते. प्रशासनाला मी नेहमी हेच सांगतो, संकटे आल्यानंतर जीवितहानी होऊ देऊ नका, जीवितहानी कमीतकमी होईल याकडे लक्ष द्या, असे मुख्यमंत्र्यानी सांगितले आहे.

“मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरू झाले आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. नुसता विचार नाही तर प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा, ते आम्ही पाहतोय. विमा कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. दोन-तीन दिवसांत याबद्दल आपल्याला माहिती मिळेल”.

“सर्वांना दिलासा देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. मदत करणारच आहोत. किती करायची, काय करायची, त्यावर मुंबईमध्ये काम सुरू आहे. पंचनामे सुद्धा लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, बहुतेक पंचनामे पूर्ण होत आले आहेत, सर्वांचा आढावा घेऊन किती मदत करता येईल, ती सरकार केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचं नाही. केंद्राकडून GST ची मोठी रक्कम येणं बाकी आहे. आपल्या हक्काचे पैसे आपल्या खिशात असते, तर तेलंगणाप्रमाणे आपण सुद्धा मदत केली असती. केंद्राकडून येणारे पैसे आपल्या हक्काचे आहेत, ते यायलाच हवेत”.

जे जे करता येणे शक्य आहे, ते आम्ही करणार. जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत. सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे काही करेन, ते व्यवस्थित करेन, असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरपंच परिषद संघटनेकडे शरद पवारांनी व्यक्त केला आशावाद…

News Desk

नागपूर शहराच्या उपराजधानी दर्जाला लक्षात घेऊन भरीव निधी देणार! – अजित पवार

Aprna

कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका, तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू, मातोश्रीवरून आदेश 

News Desk