HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे हस्ते २७ जुलैला बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे होणार भूमिपूजन

मुंबई | मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसंच राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत २७ जुलै रोजी होणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला उच्चाधिकार समितीने मान्यता दिली असून, या चाळींच्या विकासाचा प्रश्न सुटला आहे.

दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी दिली.वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ व नायगांव येथील शासनाच्या ३४.०५ हेक्टर जागेवर १९५ चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळ+3 मजल्यांची असून त्यात प्रत्येकी ८० रहिवासी गाळे आहेत. बी. डी. डी. चाळींचा पुनर्विकास योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या जमिनीवर या योजनेव्दारे १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळयाव्यतिरिक्त सुमारे ८ हजार १२० विक्रीयोग्य गाळे बांधण्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळचे सभापती विजय नाहटा, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अनिल डोंगरे आदि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नक्षली हल्ल्यातील शहीद जवानांना मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची श्रद्धांजली

News Desk

टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा; केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Aprna

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्या ३४ जणांपैकी १ जण पॉझिटिव्ह

News Desk