HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, आता मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनाही भेटणार!

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडे दिले आहे. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘राष्ट्रपतींना पत्र, पंतप्रधानांची भेट घेणार’ – उद्धव ठाकरे

गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याबाबतच राज्यपालांना भेटलो.. निकालामध्ये म्हटलंय आरक्षणाचा अधिकार राज्याचा नाही तर केंद्राचा आहे.. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवू.

“आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधीमंडळाने हा एकमताने निर्णय घेतला होता त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आज जसं राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन पत्र देऊ”.

“आज राष्ट्रपतींना पत्र दिलं आहे. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने पहिली पायरी म्हणून राज्यपालांची भेट घेतली.आम्ही बोललो होतो, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करु, ते आम्ही राज्यपालांच्या माध्यमातून केली आहे”.

“मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. त्यांनामाहिती आहे, ही लढाई सरकारविरोधात नाही, सरकारही सोबत आहे. या समाजाच्या मागणीविरोधात कोणताही पक्ष नाही… जो काही समजूतदारपणा दाखवला आहे, त्याबद्दल मी धन्यवाद देतो… सरकार मराठा समाजाच्या सोबत आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“योगींनी फक्त मशिदीवरील नाही तर यूपीमध्ये मंदिरावरील भोंगे देखील बंद,” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

‘बहाणेबाजी बंद करा, तुम्हाला जबाबदारी झटकून चालणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

News Desk

Jayant Patil HW Exclusive : …म्हणून शरद पवार अस्वस्थ आहेत !

News Desk