HW News Marathi
Covid-19

नाशिकनंतर आता गोव्यातील रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती

पणजी | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आरोग्य व्यवस्थेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातही ऑक्सिजनचा तुटवडा ही मोठी बाब आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचा जीव गेला होता.

त्याच घटनेची पुनरावृत्ती गोव्यात झाली आहे. गोव्यातील एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती लागली आहे. गोव्यातील रुग्णालयात ऑक्सिजन टँकला मोठी गळती लागली आहे. परिसरात पांढरा धुर पाहायला मिळत आहे. ही गळती रोखण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.

साऊथ गोवामधील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती लागली. त्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. ऑक्सिजन टँक गळतीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत ऑक्सिजनची गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु होते. यादरम्यान रुग्णालय परिसरात पांढऱ्या धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं आहे.

नाशिकमध्ये २४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिलला दुपारीच्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला होता. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मातोश्री बाहेरील ३ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

लवकरच राज्यात जिम्स अन् सलून्स पुन्हा सुरु होणार, राज्य सरकारचा निर्णय

News Desk

चक्रीवादळापेक्षा कोरोनाच्या वादळाला थांबवा, संजय राऊतांनी पुन्हा केंद्राला डिवचले

News Desk