HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचा स्वत:च्या मुलावर विश्वास नसेल! – चंद्रकांत पाटील

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता हट्ट करू नये, उद्धव ठाकरेंचा स्वत:च्या मुलावर विश्वास नसेल, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित करत महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज (२२ डिसेंबर) सुरू झाले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अधिवेनात मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. पाटलांनी काल (२१ डिसेंबर) रश्मी ठाकरेंना आधी मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल, असे देखील म्हटले होते.  

मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे गैरहजर असणे स्वाभावीक आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्या, अशी परंपरा आहे. आणि त्यांची देखील एक मोठी प्रक्रिया आहे, कारण तो चार्ज राज्यपालांकडे नोंदविला जातो. राज्यपालांना किती मानायचे नाही ठरविले तरी देखील तेथे नोंद करावी लागते. राज्यपालांशिवाय काही करता येत नाही. अन्य दोन पक्षांमध्ये त्यांचा अविश्वास  स्वाभाविका आहे. कारण त्यांनी चार्ज घेतला तर सोडणार नाहीत.आणि त्यांच्या पक्षातीलही कोणावर विश्वास नसेल. तर मग त्यांनी आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यावा लागेल. त्यांचा स्वत:च्या मुलावर विश्वास नसेल.

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्या

“दोन वर्षापूर्वी बहुमत नसताना कृत्रिम बहुमत निर्माण करून, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच ना. रश्मी वाहिनी मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला काही आश्चर्य वाटणार नाही. रश्मी वहिनीनी मुख्यमंत्री होण्याच्या आधी मंत्रिमंडळात सामील व्हावे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन चार्ज घ्या. तसेच उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन सर्व मंत्रिमंडळ बरखास्त करायचे असते. कधी कधी काय असते हम करे तो कायदा झालेले आहे. काही नियम नाही. मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या सर्व सहकार्यांना एका अर्थाने उद्धवजी नेतृत्त्व करतात. सर्व मंत्रिमंडळ पहिल्यांदा बरखास्त करावे लागेल. आहे हिम्मत नाही, मग काय करावे लागेल चार्ज द्यावा लागेल. चार्ज देणे सोपे आहे, रश्मी वहिनींना द्या, मुख्यमंत्री पदाचा चार्ज पण त्याआधी त्यांना मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने ‘ते’ पुस्तक तर मागे घ्यावेच, पण संपूर्ण देशातील जनतेची माफी मागावी !

News Desk

Poladpur Bus Accident | मृतांच्या नातेवाईकांकडून सावंत-देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी

News Desk

विधानपरिषद उपसभापतींसह मंत्र्यांची पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात बैठक

Aprna