HW News Marathi
देश / विदेश

देशात पहिल्या नंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच!

मुंबई | देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटाचा गेले दीड वर्ष राज्याचा गाडा सक्षमपणे हाकणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपली पसंती दाखवली आहे. ‘प्रश्नम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब झाले असून देशाची 67 टक्के लोकसंख्या असलेल्या 13 राज्यांतील सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सर्वाधिक सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. जनतेने दिलेल्या कौलानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच देशात नंबर वन ठरले असून त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे तिसऱ्या स्थानी आहेत.

‘प्रश्नम’ संस्थेने महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 13 राज्यांतील जनतेचा काwल जाणून घेतला. सुमारे 17,500 मतदारांनी सहभाग नोंदवलेल्या या सर्वेक्षणात सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शविली आहे. ‘द प्रिंट’ने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे पाचव्या स्थानी आहेत.

गुजरात, पंजाब, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी

पंजाबमध्ये विद्यमान मुख्यमंत्र्यांबाबत नाराजीचा सूर आहे. तर नुकतेच उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पदावरून तिरथ सिंह रावत यांना माघार घ्यावी लागली होती. लोकप्रिय नसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत. 60 टक्के मतदारांनी त्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नकोत असे म्हटलेय, तर 15 टक्के लोकांनी त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं; पण पुन्हा मत देण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले आहे.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांबाबत सर्वाधिक नकारात्मक उत्तर मतदारांनी दिले. नुकतंच तिथं नव्या मुख्यमंत्र्यांकडे राज्याची सूत्रे सोपवली असली तरी तिथल्या आधीच्या नेतृत्वाबाबत 80 टक्के मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची कामगिरी खराब असून पुन्हा मुख्यमंत्री नकोत असे मत दिले आहे. उत्तराखंड आणि पंजाबनंतर यादीत गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये विजय रुपानी मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंड, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

पुढच्या टप्प्यात कोणत्या राज्यांत होणार सर्व्हेे?

नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम या राज्यांचा यात समावेश नाही. तसंच आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात पॅनेल नसल्यानं तिथं सर्व्हे करता आला नाही. पुढच्या फेरीत या राज्यांमध्ये सर्व्हे होईल अशी आशा प्रश्नमकडून व्यक्त करण्यात आली आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, यावर उत्तर देताना सर्वाधिक मते ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. सर्व्हेमध्ये जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं आणि त्यांना पुन्हा मत मतदान करू असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याखालोखाल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मते मिळाली आहेत. तर तिसऱया स्थानी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आहेत.

सर्वेक्षणात कोणते प्रश्न विचारले?

मुख्यमंत्र्यांच्या रेटिंगबाबत घेण्यात आलेला सर्वात मोठय़ा सर्व्हेपैकी हा एक असल्याचा दावा आहे. सर्व्हेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांत 1. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब आहे आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये 2. कामगिरी चांगली असली तरी पुन्हा मत देणार नाही 3. मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे आणि पुढच्या वेळी हेच मुख्यमंत्री हवेत असे पर्याय देण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारला चौकशीचा अधिकार नाही, एसआयटी करणार चौकशी

Gauri Tilekar

शरद यादवचा आरजेडीला पाठिंबा-लालू

News Desk

अयोध्या प्रकरणातील वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन न्यासाला द्यावी

News Desk