HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन

अलिबाग | काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं आज (१५ जुलै) निधन झालं आहे. अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार असणारे मधुकर ठाकूर यांनी पहाटे ५ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.मधुकर ठाकूर गेल्या ३-४ वर्षांपासून आजारी होते.

झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. आज दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या बालकांची सुटका

Manasi Devkar

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘हा’ निर्णय घेतल्यामुळे गोपीचंद पडळकरांनी मानले आभार

Aprna

महाराष्ट्रात जरी आघाडीचं सरकार असलं तरी बाळासाहेब थोरातांना बळकट करायचे आहे, पृथ्वीराज चव्हाणांचे सुचक वक्तव्य

News Desk