HW News Marathi
महाराष्ट्र

राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार – संजय राऊत

मुंबई | अयोध्येत आज (५ ऑगस्ट) राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आनंद व्यक्त केला. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. मात्र, त्याचवेळी घुमट काढण्यात शिवसैनिकांचा मोठा वाटा असल्याचे सांगताना कुणीही याचे श्रेय घेऊ नये असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार आहे. शिवसेना तेथे थाटामाटात कार्यक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संजय राऊत म्हणाले, “राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन झाले. आजच्या कार्यक्रमाचे श्रेय कोणीही घेऊ नये. कारण हा शासकीय कार्यक्रम आहे. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरु शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे. अनेकांचे यात योगदान आहे. घुमट काढताना शिवसैनिकांचं मोठं योगदान”, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. आम्ही अयोध्येत राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने तिथे कार्यक्रम करणार आहे. आजच्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी वयोमानामुळे उपस्थित राहू शकले नाहीत,” असंही संजय राऊत यांनी नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना संकटातही गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी!

News Desk

आज राज्यात ३५० नवीन रुग्णांचे निदान, एकूण रुग्णसंख्या २६८४ वर पोहोचली

News Desk

अखेर खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरला!

News Desk