HW News Marathi
Covid-19

पुणे जिल्हयातील ‘या’ तालुक्यात पर्यटनासाठी नागरिकांना असणार बंदी

मुंबई | राज्यात पुण्यात सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. यानंतर पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत गेली. पुण्यातील काही भाग तर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, आता पुण्याचे चित्र बदलत गेले आहे. पुण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात आता वाढ झाली आहे. पुणे शहरात ६३ टक्के कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर आता केवळ ३२ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत पुण्यात कोरोनामुक्त होण्याच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तरी पुणे शहराला कोरोनाविरोधात लढाई काळजीपूर्वक लढावी लागणार आहे

दरम्यान, पुणे जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या सर्वात जास्त पाऊस होणाऱ्या तालुक्यामध्ये असणाऱ्या भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठया प्रमाणात नागरिक दरवर्षी पर्यटनासाठी गर्दी करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली आहे.

भुशी डॅम व इतर धरण परिसरामध्ये पर्यटनासाठी बंदी

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) (३) (४) अन्वये जिल्हयात भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भुशी डॅम व इतर धरण परिसरामध्ये पर्यटनासाठी बंदी करण्यात येत आहे. या आदेशाचा कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनिहाय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरीविरोधी कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही !

News Desk

देशात ३१ ऑगस्टपर्यंत ‘अनलॉक ३’, ‘कंटेन्टमेंट झोन’मध्ये पुन्हा नियम कडक

News Desk

फडणवीसांपासून-खडसेंपर्यंत भाजपच्या नेत्यांचे राज्य सरकारविरोधात ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

News Desk