HW News Marathi
देश / विदेश

#JantaCurfew : जाणून घ्या.. देशभरातील कोणकोत्या सेवा सुरू आणि बंद राहणार

मुंबई | संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आता भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भा वाढत असून या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२२ मार्च) जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या कर्फ्यूदरम्यमान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडू नका, घरात सुरक्षित राहा, असा सल्ला मोदींनी जनतेला दिला.

देशातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि लहान मुलांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना मोदींनी देशातील जनतेला म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशातील जनतेसह वेगवेगळ्या व्यावसायिक संस्था आणि युनियनने समर्थन केले. ‘जनता कर्फ्यू’ म्हणजे ‘जनतेसाठी जनतेने लावलेला कर्फ्यू’ असे आहे. मात्र, ‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी कोणकोणत्या

देशभरातील ‘या’ सेवा सुरु

  • सरकारी आणि खासगी रुग्णालय
  • औषधं दुकाने
  • किराणा दुकाने
  • दूध डेअरी
  • सरकारी कार्यालय (फक्त 25 टक्के कर्मचारी )

 

देशभरातील ‘या’ सेवा बंद असणार

मेल/एक्सप्रेस ट्रेनही बंद

‘जनता कर्फ्यु’च्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रशासनाने शनिवारी (२१ मार्च) मध्य रात्रीपासून ते रविवारी (२२ मार्च) रात्री १० वाजेपर्यंत कोणतीही पॅसेंजर ट्रेन चालणार नाही. रविवारी सकाळी ४.०० वाजता मेल/एक्सप्रेस ट्रेनही बंद होणार आहेत. रविवारी रात्री १० वजेपर्यंत सर्व इंटरसिटी ट्रेन रद्द करण्यात आल्या आहे याशिवाय ७०० हून अधिक रेल्वे अगोदरपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत.

आजपासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद

कोरोनाचा प्रार्दुभाव लोकल ट्रेनमधून होण्याची शक्यता सर्वाधित असल्यामुळे राज्य सरकारने आजपासून ते ३१ मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन प्रवासावर निर्बंध लागू केले आहेत. यानुसार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. याबाबतची विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. मुंबईच्या लोकल ट्रेन मधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने हे कठोर पाऊल उचलण्याचे बोले जात आहे.

देशातील मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर देशातील दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, नोएडा, लखनऊ येथील मेट्रो सेवा बंद राहणार आहे. तसेच मुंबईकरांनी देखील घरात राहून जनता कर्फ्यूचे पालन करावे, यासाठी मुंबई मेट्रो-मोनो घाटकोपर-वर्सोवा सेवा रविवारी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेत मोदींच्य जनता कर्फ्यूचे समर्थन करत, यात सहभागी झाले आहेत.

विमानांच्या उड्डाणात कपात

देशाच्या वेगवेगळ्या भागात जाणाऱ्या विमानांच्या उड्डाणात कपात जाहीर केली आहे. गो एअर, इंडिगो, एअर विस्तारा यांच्या उड्डाणांची संख्या रविवारसाठी घटविण्यात आली आहे. तसंच रविवार, २२ मार्चपासून परदेशातून येणाऱ्या एकाही विमानाला देशाच्या भूमीवर उतरू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ३६ देशांमधून येणाऱ्या विमानांवर ही बंदी होती. करोनामुळे स्वदेशी विमानसेवा कंपन्यांनी त्यांची उड्डाणे स्थगित केल्याने हा आकडा ७५ च्या खाली आला. सध्या २७ परदेशी विमानसेवा कंपन्यांच्या ४५ ते ५० विमानांची मुंबईला ये-जा सुरू होती. पण त्या सर्व सेवा आता २२ पासून आठवडाभरासाठी स्थगित होणार आहेत.

​बस-कॅब सेवा बंद

देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, ओडिशा, दिल्ली यांराख्या राज्यांत सरकारने बस सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे ओला आणि उबर सारख्या कॅब सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनन्याही आपले जास्त ड्रायव्हर रस्त्यावर राहणार नाहीत, याकडे लक्ष देणार आहेत.

पेट्रोल पंप बंद

देशातील राज्यातील सरकारने पेट्रोल पंपाबाबत वेगवेगळे निर्देश देण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेल जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने पंप बंद करणे शक्य नाही. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटकात पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. महाराष्ट्रात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांत मोठ्या प्रमाणात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोल पंप मर्यादित वेळेसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय पेट्रोल डीलर असोसिएशनने घेतला आहे. महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोल पंप शनिवारपासून ३१ मार्चपर्यंत सकाळी आठ ते सायंकाळी ४ या वेळेत आणि शहराबाहेरील पंप सकाळी सात ते रात्री ११ या वेळेत सुरू राहणार आहेत.

​हॉटेल आणि रेस्टॉरन्टही बंद

देशातील वेगवेगळ्या राज्यांत हॉटेल आणि रेस्टॉरन्टही बंद ठेवण्यात येणार आहेत. काही राज्यांत हॉटेल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ‘जनता कर्फ्यु’च्या काळात नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मोदींकडून करण्यात आले आहे. मोठ्या शहरांतदेखील जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित सर्व दुकाने, मॉल, हॉटेल बंद करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाजप हिंदू विरोधी, लक्ष्मी आणि दुर्गेची शक्ती फक्त १०-१५ जणांच्या हाती’- राहूल गांधी

News Desk

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

swarit

चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडणार

News Desk