नवी दिल्ली | जगभरात हाहाकार माजविणार कोरोना व्हायरसने भारतात दाखल झाला आहे. यावर कोरोना व्हायरस होऊ नये, म्हणून सरकारकडून खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले आहे. देशभरातील विमानतळावर पर्यटकांची तपासणी केली जात आहे. कोरोनासाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे आदेश दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. तसेच कोरोनाच्या संशयित रुग्णासाठी विषेश वॉर्डची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी आज (४ मार्च) आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
Union Health Minister Dr Harsh Vardhan: Till now, there have been 28 positive cases of Coronavirus in India https://t.co/kyxBangCQX
— ANI (@ANI) March 4, 2020
आरोग्यमंत्री म्हणाले की, विमानतळावर थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली असून याद्वारे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दिल्ली सरकार आज दुपारी ३ वाजता कोरोनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक बोलविली असल्याची माहिती सरकारने दिली आहे. तर देशात कोरोना बाधित रुग्णाची संख्या २८ वर येऊन पोहचल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
तसेच इटलीहून आलेल्या १७ पर्यटकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील १६ जण इटलीचे असून १ भारतीय नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोना बाधिथ पर्यटकांना आयटीबीपी काॅम्पसमध्ये ठेवण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.