HW News Marathi
महाराष्ट्र

‘वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये म्हणून दिल्लीत प्रतिनिधित्व करणारा केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य’!

सिंधुदुर्ग। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावरुन आता सिंधुदुर्गमध्ये राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसतात. शिवेसना खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात सातत्याने आरोपांच्या फाईल होत असतात. आणि आता देखील तसंच काहीसं झालंय, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विनायक राऊत यांनी आता पुन्हा एकदा टीका केलीय. वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये म्हणून या जिल्ह्यातील दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करणारा केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी नारायण राणें यांचं नाव न घेता म्हटलं आहे.सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालया बाबतचा खरा झारीतील शुक्राचार्य हा जिल्ह्याचं नवी दिल्लीत प्रतिनिधीत्व करणारा केंद्रीय मंत्री आहे. इतर जी शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय आहेत सातारा, अलिबाग, पुणे इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांपेक्षा सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. मात्र, सिंधुदुर्गमधील त्या मंत्र्याच्या खासगी वैद्यकीय रुग्णालयावर परिणाम नको म्हणून परवानगी नाकारली जात आहे.

नारायण राणे यांना जणांची ना मनाची काहीतरी वाटली पाहिजे

नारायण राणे यांना अशा सगळ्या शब्दांची चांगली ओळख आहे मंत्री पदाचा वापर करून कलेक्शन कसं करायचं आणि त्रास देऊन त्यांना कस लुबाडायचं हा अनुभव नारायण राणे यांच्या पाठीशी मोठा असल्यामुळे स्वतःच्या अनुभवावरुन अनिल परब यांची तुलना करतायत दोन दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत महागाई भता वाढ करण्याची जबरदस्त ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणारा आहे अशा पद्धतीचा निर्णय नारायण राणे यांच्या कारकिर्दीत घेतला नाही त्यामुळे त्यांची पोट दुःखी ती आहे

नारायण राणे यांचा जीव सी वल्डमध्ये गुंतलेला आहे सी वल्ड फक्त करायचा 300 एकरमध्ये 1400 एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेल उभी करायची हा धंदा नारायण राणे यांचा होता ना त्यापासून ते दूर गेलेले नाहीत हा त्यांचा प्रयत्न चालूच रहाणार आहे कोणत्याही परिस्थितीत वायंगणी, तोंडवळीमध्ये गाव उदवस्त करून सी वल्ड होणार नाही म्हणजे नाही !

नानार रिफायनरी बाबत नारायण राणे यांना जणांची नाही तर मनाची काहीतरी वाटली पाहिजे नानार रिफायनरी होता कामा नये म्हणून संपूर्ण देवगडमधून गाड्याच्या गाड्या भरून मोर्चे काढले होते त्यावेळी भाजप सरकारवर टीका देखील केली होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून भाजपवाले गल्लीबोळात यात्रा काढत आहेत-जयंत पाटील

News Desk

कांदा निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा !

swarit

जालन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण, जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात

News Desk