HW News Marathi
देश / विदेश

खेळवत ठेवणं हेच शरद पवारांचं काम!; ST च्या मुद्द्यावरून नारायण राणेंची टीका

मुंबई । राज्यातील ST कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. एकीकडे राज्य सरकारकडून होणाऱ्या आवाहनाला न जुमानता एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तर दुसरीकडे भाजपने या संपूर्ण प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकारची मोठी कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत. खेळवत ठेवणं हेच त्यांचं काम आहे”, असं म्हणत राणेंनी पवारांवर निशाणा साधला आहे. त्याचसोबत, आता एसटी संदर्भात केंद्राने तोडगा काढावा असंही राणेंनी यावेळी सुचवलं आहे.

नारायण राणे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “शरद पवार हे कधीच तोडगा कधीच काढत नाहीत. खेळवत ठेवणं हेच त्यांचं काम आहे. या विषयावर देखील पवार तोडगा काढणार नाही. पवार काय निर्देश देऊ शकत नाहीत का? ज्यांनी हे एवढं सरकार बनवलं ते सांगू शकत नाहीत का? की एसटीच्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय द्या. पण ते तसं करणार नाहीत.”

 

आता थेट केंद्रानेच महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यायला हवेत!

पुढे केंद्र सरकारने एसटीच्या या प्रकरणात हस्तक्षेप करावा असं सुचवताना नारायण राणे म्हणाले की, “आता केंद्र सरकारने थेट महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यायला हवेत की हा प्रश्न त्वरीत मिटवा किंवा आम्ही राज्यपालांकडे याबाबतचे अधिकार देऊ. जो मार्ग अवलंबायचा त्याबद्दल मी स्वत: पंतप्रधान मोदींशी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेन. लवकरात लवकर मार्ग काढून आमच्या कर्मचाऱ्यांना यातून वाचवा अस मी सांगेन. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी राज्याचे जे कोणी परिवहनमंत्री आहेत त्यांच्याशी देखील बोलेन.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारने सुरू केले नवे व्यासपीठ 

News Desk

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरांनी घेतली राहूल गांधींची भेट

News Desk

भारतीय सैन्य दलात योगदान देणारे महाराष्ट्रातील ‘परम विशिष्ट सेवा पदक’, ‘शौर्य पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Aprna