HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकार जून महिन्यात कोसळणार, नारायण राणेंची भविष्यवाणी

मुंबई | महाविकासआघाडी सरकार जून महिन्यात कोसळणार आहे, अशी भविष्यवाणी  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. राणेंनी आज (१९ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार राज्याला विकास कामासाठी पैसे देत न अशी ओरड राज्य सरकार वारंवार करत आहे. यावर राणे म्हणाले, “राज्य सरकार हे विकास कामे कमी आणि राजकारण जास्त करते, अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. 

राणे म्हणाले, “आमच्या इकडे कोकणात ना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुनच्या सुरुवातीला वादळ येते. आणि या वादळात हलणार झाडे ही फाद्यासकट कोसळून पडतात पडणार आहे. हे तीन पक्षाचे एक झाड आहे. या फांदीवर मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री हे खोडावर नाही. महाविकासआघाडी सरकार जून महिन्याआधी जाणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.” यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

राणेंच्या बंगल्यावरील कारवाई संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “मी जो बंगला बांधला आहे. यात इललिगल असे काही नाही. तरी देखील कारवाई केली तर माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पंरतु, राज्य सरकारने मला सुडाच्या राजकारणाने नोटीस पाठवली. पावसाचा अंदाज हा हवामान खात्याकडून घेऊन राजकारणासोबत जोडले आहे. मात्र, माझा लोकशाहीवर विश्वास आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा उमेदवार हरला तरी पर्वा नाही ! पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं विधान

News Desk

कृषी कायद्याविरोधात बातचीत करण्यासाठी शरद पवार थेट राष्ट्रपतींना भेटणार

News Desk

फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही कारण महाराष्ट्राला त्यांची गरज! – संजय राऊत

News Desk