HW News Marathi
महाराष्ट्र

“लोकांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये…” – नारायण राणे

मुंबई । “लोकांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच कशाला?”, असा बोचरा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज (५ नोव्हेंबर) केला. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. नुकतंच मलिकांनी सांगितलं की, ‘वानखेडेंच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू प्रचंड महागड्या आहेत. हजारो-लाखोंच्या घरातल्या आहेत.’ याच पार्श्वभूमीवर, आता नारायण राणेंनी मलिकांना सुनावलं आहे.

नवाब मलिकांवर निशाणा साधताना नारायण राणे म्हणाले, लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का? ही चांगली सवय नाही. कोण काय आणि कितीचं वापरतंय? याच्याशी नवाब मलिकांना काय कराचयंय? त्यांनी स्वतःचं पाहावं. उद्या त्यांचं असच काही बाहेर काढलं तर अवघड होईल, असा इशारा नारायण राणेंनी नवाब मलिकांना दिला. नारायण राणे यावेळी पत्रकारांशी बोलत होते.

समीर वानखेडेंच्या दैनंदिन वापरातील वस्तूंची किंमत सांगून वानखेडे ५० हजारांचं शर्ट पँट वापरतात इथपर्यंत मलिकांनी टीका केली होती. इतके पैसे आले कुठून? असा सवालही यावेळी मलिकांनी उपस्थित केला होता. २ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेनंतर मलिकांवरही टीका झाली. त्यानंतर आता राणेंनीही संधी साधली आहे. टीका करतानाच यावेळी नारायण राणेंनी मलिकांना धमकीवजा इशाराही दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

News Desk

उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा! – मुख्यमंत्री

Aprna

सेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅस गळती, कामगाराचा गुदमरुन मृत्यू, ११ जण गंभीर

swarit