नवी दिल्ली | लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर आज (३० जुलै) राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे. तिहेरी तलाक विधेयक दुपारी १२ वाजता कायदा मंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभेत सादर होणार आहे. लोकसभेत बहुमत असल्याने हे विधेयक सहजरित्या मंजूर करण्यात आले. राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारला एनडीएचे घटकपक्ष आणि अन्य इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
Union Minister of Law and Justice, Ravi Shankar Prasad to table “The Muslim Women (Protection of Rights on Marriage) Bill, 2019 in Rajya Sabha at 12 pm, today. (file pic) pic.twitter.com/a54MsP3xOA
— ANI (@ANI) July 30, 2019
दरम्यान, तिहेरी तलाक विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत बहुमत बहुमत मिळाले नाही, तर मोदी सरकारला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. राज्यसभेत भाजप आणि काँग्रेसच्या सर्व खासदारांनी उपस्थित राहण्यासाठी पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आली आहे. मात्र राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला अग्निपरीक्षा द्यावी लागली आहे. राज्यसभेत एनडीएकडे बहुमत नाही. राज्यसभेत भाजपकडे ७७ खासदार तर एनडीएची संख्या १०३ पर्यंत मर्यादीत आहे.
Congress party issues whip to its Rajya Sabha MPs to be present in the House, today. pic.twitter.com/JWjR848KvL
— ANI (@ANI) July 30, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.