HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना काँग्रेससोबत गेली तर ती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची प्रतारणा होईल !

मुंबई | शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा आग्रही भूमिका बाजुला ठेवा, तर शिवसेनेने काँग्रेससोबत जाणेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा ठरणार आहे, अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना मांडळी आहे.

आठवले म्हणाले की, शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी असलेली आग्रही मागणी सोडून १६ मंत्री पदे, चांगली खाते आणि दिल्ली मंत्री पद, अशा पद्धतीने सेने तडजोड करावी, अशी इच्छा आठवले यांनी व्यक्त केली आहे. भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असून शिवसेनेने भाजपच्या ऑफरचा विचार करावा, असे म्हणाले. शिवसेनेने काँग्रेससोबत जाणेही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा ठरणार आहे, अशी स्पष्ट भूमिका आठवलेंनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना म्हणाले.

शिवसेना-भाजप यांच्या युतीला जनतेने दिलेला स्पष्ट बहुमताचा जनादेश शिवसेनेने डावलू नये. भाजप सोबत वाद मिटवून तडजोड करून एकत्र सरकार स्थापन करावे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत एकत्र येण्याचा शिवसेनेचा प्रयोग असेल तर आपण लवकरच शरद पवार यांची भेट घेऊ. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ने शिवसेनेसोबत सरकार स्थापण्याचा निर्णय घेऊ नये यासाठी शरद पवार यांची आपण भेट घेऊ असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी उपस्थित केला भाजपच्या संस्कारांवर प्रश्न!

News Desk

फडणवीसांनी शपथविधी उरकण्यासाठी मिरची हवन केले होते?

News Desk

संजय राऊतांचे नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहील; भाजप आमदाराचा टोला

Aprna