HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसंघ सोशल फाउंडेशनची पोलीस बांधवांसोबत अनोखी रक्षाबंधन!

पुणे। भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करतो म्हणूनच रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण साजरा केला जातो. आणि याच निमित्ताने शिवसंघ सोशल फाउंडेशनच्या वतीने (23 ऑगस्ट) सिंहगड पोलिस स्टेशन येथे पोलिस बांधवांसोबत अनोखी रक्षाबंधन साजरी करण्यात आली आहे. शिवसंघ सोशल फाउंडेशन ने आजपपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात काम केले आहे.अनेक विद्यार्थी मित्रांना शिक्षणासाठी मदत करण्यात आली आहे. तर शिवसंघ तर्फे कोरोना महामारी मध्ये अनेक रुग्णांना बेड मिळवून देणे, बिलात सवलत मिळवून देणे,अनेकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळवून देणे अशा प्रकारची काम करण्यात आली.

तरी यावेळी रक्षाबंधनच्या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्गदर्शक घेवारे साहेब, पोलीस निरीक्षक वाघमारे आणि कर्मचारी यांच्या सोबत शिवसंघ परिवारातील भगिनींनी रक्षाबंधन साजरी केलीये.ज्योती ताई गायकवाड, पूजा ताई झोळे, अविनाश दिघे, ऋषिकेश सणस, आणि तानाजी भोसले यांनी सहकार्य केले.पोलीस बांधवाना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून महापुरुषांची पुस्तक भेट देत रक्षाबंधन साजरी करण्यात आली. शिवसंघ सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य च्या या उपक्रमाचे महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पांगरखेडा येथे आगीत गुरेढोरे मृत्युमुखी

News Desk

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन, ऑफिस जाळून देण्याची दिली धमकी

News Desk

मराठा आरक्षण मसुद्याच्या मंजुरीसाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक

swarit