HW News Marathi
Covid-19

बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना बसणार चाप!

मुंबई | सध्या लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच देण्यात आली आहे. मात्र , बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र लिहिलं आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी आता राज्य सरकारची परवानगी लागणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास देण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकलमधून होणारी घुसखोरी टाळण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सध्या मध्य रेल्वेतून 18 लाख प्रवासी प्रवास करत आहेत तर पश्चिम रेल्वेमधून 11 ते 12 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. यापैकी जवळपास पन्नास टक्के प्रवासी बनावट आय कार्ड बनवून रेल्वे तिकीट मिळवत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास घेणे बंधनकारक राहणार आहे.

कसा मिळवायचा हा पास ?

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास मिळवण्यासाठी खालील साईटवर जाऊन आपला मोबाईल नंबरवरुन ओटीपी मिळवून विचारलेली माहिती भरायची आहे.

https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm?_qc=3b5dc24c5639dd4331a6cf6491f2386f

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण

News Desk

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे व निलम गोऱ्हेंची नावे निश्चित

News Desk

निम्म्या महाराष्ट्रात लॉकडाऊन! १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार?

News Desk