HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

Unlock 5 | ठरलं ! येत्या ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार सुरु होणार

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या काळात संपूर्ण देशभरात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र, अर्थव्यवस्थेचे चक्र रुळावर आणण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यासह देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामार्फत एक एक क्षेत्र खुली होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (३० सप्टेंबर) राज्य सरकारकडून ‘अनलॉक-५’साठीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार सुरु करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्यातील हॉटेल चालक-मालकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल, रेस्टॉरंट्स सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी केली जात होती. स्वतः राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या मागणीची दाखल घेत राज्य सरकारला याबाबत विचार करण्याचे आवाहन केले होते. अखेर राज्य सरकारने आता या मागणीची दखल घेतली आहे.

राज्य सरकरकडून ‘अनलॉक ५’साठी मार्गदर्शक सूचना जारी
  •  राज्यातील ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार सुरू होणार
  •  ५० % क्षमतेने हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू होणार
  •  मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी
  •  रेल्वे प्रवासासाठी डबेवाल्यांना क्यू-आर कोड दिला जाणार
  •  पुणे विभागातील लोकल सुरू होणार
  •  राज्यातील लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू होणार
  •  अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
काय बंदच राहणार ?
  •  शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्थांना अद्याप परवानगी नाहीच.
  • सिनेमा हॉल, जिम्स, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क देखील बंद राहणार
  • मंदिरे, धार्मिक स्थळांनाही अद्याप परवानगी नाही

Related posts

“कायम आपलं कौतुक होईल अशी अपेक्षा बाळगू नका”, आव्हाडांनी केली राऊतांची पाठराखण

News Desk

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

News Desk

शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

News Desk