HW News Marathi
देश / विदेश

‘यूपीएससी’ ने देखील नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली!

मुंबई | देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालेलं आहे. दिवसेंदिवस मोठ्यासंख्येने नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) देखील २७ जूनला होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकली आहे. ही परीक्षा आता १० ऑक्टोबरला होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत होते. मागील वर्षी देखील करोना संसर्गाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ३१ मेला होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर या परीक्षेचे ४ ऑक्टोबर २०२०ला आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन देखील टाकण्यात आलं आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा -२०२१ आणि भारतीय वन सेवा परीक्षा -२०२१ साठी २४ मार्ज पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हेलिकॉप्टरचा दरवाजा तुटल्याने कोचीमध्ये २ नौसैनिकांचा मृत्यू

News Desk

ट्रायकडून ग्राहकांना चॅनेल्स निवडीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

News Desk

अ‍ॅमेझॉनचा मालक झाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

News Desk