महाड। शुक्रवारचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट ठरला. राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले. महाडमध्येही मुसळधार पावसात मोठी दुर्घटना घडली. महाडमधील तळीये गावावर दरड कोसळली तर. या घटनेत तब्बल 35 घरांवर ही दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला. घटनेत 52 जण अजूनही बेपत्ता आहेत. अशात शुक्रवारी रात्री उशिरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तळीये गावात दाखल होत पाहणी केली.
#रायगड जिल्ह्यातील #महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये कोंडाळकरवाडीला भेट देऊन पाहणी केली.तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाड शहर जलमय झाले तर डोंगरउतारावर वसलेल्या तळीये कोंडाळकरवाडी गावात काल रात्री दरड कोसळून संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले pic.twitter.com/d3I3BNqChx
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 23, 2021
एकनाथ शिंदे यांनी गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. आज सकाळपासून पुन्हा एकदा बचावकार्याला सुरुवात होत आहे. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, की मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची नुकसानभरपाई दिली जाईल. तर, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर प्रशासनाकडून उपचार केले जातील. यासोबतच बाधित भागात पुनर्वसनाचे कामही केले जाईल, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार
गेल्या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चक्क 10 ते 15 फूट रस्त्यांवर आणि वस्त्यांत पाणी शिरल्याचं पहायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीला ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पावसाने, महापूर परीस्थिती निर्माण केली. सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे महाड शहर पुर्णपणे पाण्याखाली गेलं.
ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू
दुसरीकडे रत्नागिरीत आलेल्या महापुराचा फटका कोविड रुग्णालयाला बसला असून तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी उघड झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कोविड रुग्णालयाला चहूबाजुंनी पाण्याने वेढल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.