चिपळूण | महाराष्ट्रात पूर आल्याने लाखो लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. घर, संसार उद्ध्वस्त झाले. या सगळ्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी त्या भागाचा दौरा करावा इतरांनी विनाकारण पुरग्रस्त भागाची पाहणी करण्याचं टाळावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. मात्र, महाविकासआघाडी सरकारमधीलच काही नेत्यांनी याचा अनादर केल्याचं दिसून येत आहे. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही आता पूराचा फटका बसलेल्या चिपळूणला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी चिपळूणमध्ये भीषण स्थिती आहे त्यांना मदतीची गरज आहे, असंही सांगितलं आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे सरकारचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या सल्ल्याचा मात्र अनादर होताना दिसत आहे.
In a washed away small village Dadli in Mahad.
Most difficult part of it all is to look into their eyes..try to give them courage n lift their spirits.
We r with u 🤗😇✊#MaharashtraFloods pic.twitter.com/BuI1JSd9Hm— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) July 28, 2021
शरद पवार म्हणाले दौरे टाळा, मात्र नातवाचा कोकण दौरा सुरु!
राज्यातील या भीषण पुरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौरे केले. तसेच, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनीही दौरे केले. राजकीय नेत्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (२७ जुलै) पत्रकार परिषदेत विनाकारण राजकीय नेत्यांनी दौरे टाळावेत असा सल्ला दिला होता. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचा नातू रोहित पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.
काल (२७ जुलै) त्यांनी कोकणातील खेडचा दौरा केला. तिथे झालेल्या नुकसानीही पाहणी केली. तर, आज (२८ जुलै) त्यांनी पोलादपूरचा दौरा केला. तसेच, नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे. एकीकडे शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी सोडून दौरे टाळावेत. याचं कारण असं की तेथील प्रशासकीय यंत्रणा तुमच्यामागे लागते आणि तेथील मदतीची कामं खोळंबतात. पण, त्यांच्या नातवानेच म्हणजे रोहित पवारांनीच त्यांच्या आदेशाचे आणि सल्ल्याचे पालन न केल्याचं दिसून येत आहे.
“विरोधी पक्षनेता म्हणून दौरा येत्या ३ दिवसांत करणारचं” शरद पवारांच्या आवाहनाला उत्तर…!
महाराष्टात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी विचारल्यावर पवारांचा सल्ला योग्य असल्याचं सांगत आपला दौरा मात्र सुरुच ठेवणार असल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आम्ही गेल्यावर शासकीय यंत्रणा जागी होते
‘पवार साहेबांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते.
शरद पवार काय म्हणाले होते?
माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या भूकंपा वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे अनावश्यक दौरे टाळावे. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली ते दहा दिवसानंतर आले. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो . पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो, असं शरद पवार म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.