मुंबई | काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर मातोंडकर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली. त्यांनी मातोंडकरांना विधानसभाच्या प्रचाराला येण्याची गळ घातली आहे. यासदंर्भात दोन दिवसांत उर्मिला मातोंडकर आपला निर्णय कळवणार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबई शहर काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप उर्मिलाने राजीनामा दिला होता. मातोंडकर या लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून सहभागी होतील, असा दावा गायकवाड यांनी केला आहे. पक्षाला रामराम ठोकल्यानंतर मातोंडकर पुन्हा एकदा काँग्रेसच्या मंचावर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उर्मिलाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. बॉलिवूड सेलेब्रिटी, उत्तम वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व असूनही उर्मिलाला गोपाळ शेट्टींना मात्र मात देता आली नाही. शेट्टींना ७ लाख ६ हजार तर उर्मिलाला २ लाख ४१ हजार मते मिळाली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.