HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देते गेलेल्या नेत्यांचे निवडणुकीत नेमके काय झाले

मुंबई | विधासभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. पक्षातील दिग्गज नेत्यांनी सात सोडून गेल्यानंतर ही निराश न होता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभर दौरे केले. यामुळे आज (२४ ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतून राष्ट्रवादीला जनतेने दिलेला कौल दिसून येत आहे. मात्र, पवारांची सात सोडून गेल्या नेत्यांपैकी राणा जगजितसिंह पाटील, भास्कर जाधव या दोघा आमदारांनाच विजय मिळवता आला आहे. दिलीप सोपल, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा यांना पराभव झाला.

नमिता मुंदडा यांच्याविषयी फारच रंजक गोष्ट घडली. शरद पवार यांनी मुंदडा यांना केजमधून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर मुंदडा यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भाजपचा झेंडा हाती धरला. त्या याआधी आमदार नव्हत्या. परंतु भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या आहेत.

राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते

  • सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उदयनराजे भोसले यांच्या पराभव झाला आहे.
  • राष्ट्रवादीतील उस्मानाबादमधील तुळजापुरचे माजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विजयी
  • राष्ट्रवादीतील अहमदनगरमधील श्रीगोंदाचे माजी आमदार बबनराव पाचपुते
  • अहमदनगरमधील अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड पराभव
  • बीडमधील केजच्या नमिता मुंदडा विजयी

राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आमदार

  • रत्नागिरीमधील गुहागरचे भास्कर जाधव यांचा विजयी झाले आहे.
  • बीडमधील जयदत्त क्षीरसागर विजयी
  • ठाणेमधील शहापूरचे पांडुरंग बरोरा यांचा पराभव
  • सोलापूर बार्शीमधील दिलीप सोपल यांचा पराभव
  • सोलापूर करमाळातील रश्मी बागल यांचा पराभव
  • सातारातील माणचे शेखर गोरे यांचा पराभव

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम; कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Aprna

सायन रुग्णालय आंदोलन प्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

News Desk

भाजप नेते प्रसाद लाड यांना आर्थिक गुन्हे शाखेने बजावले समन्स

News Desk