HW News Marathi
महाराष्ट्र

उर्मिला मातोंडकर सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या लवकरच पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काहीच महिन्यांपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, लवकरच उर्मिला या पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारी (३० नोव्हेंबर) उर्मिला या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान, यापूर्वी शिवसेनेकडून विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त आमदारकीसाठीही उर्मिला मातोंडकर यांचे नाव देण्यात आल्याचेही वृत्त आहे.

राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी १२ जणांच्या नावांची यादी ६ नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, राज्यपालांनी अद्यापही या १२ नावांबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, शिवसेनेकडून देण्यात आलेल्या नावांमध्ये उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा समावेश असल्याचे वृत्त होते. त्यानंतर, आता उर्मिला यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेना –

१)उर्मिला मातोंडकर

२) नितीन बानगुडे पाटील

३) विजय करंजकर

४) चंद्रकांत रघुवंशी

काँग्रेस-

१) सचिन सावंत

२) रजनी पाटील

३) मुजफ्फर हुसैन

४) अनिरुद्ध वणगे – कला

राष्ट्रवादी काँग्रेस-

१) एकनाथ खडसे

२) राजू शेट्टी

३) यशपाल भिंगे – साहित्य

४) आनंद शिंदे – कला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश, सामनातून भाजपवर टीका

News Desk

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबन प्रकरणी मुंबईत सेना-भाजपमध्ये जुंपणार?

Aprna

बारमाही टिकतील असे रस्ते बनवणार, शिवसेनेच्या वचननाम्यातील आश्वासन

News Desk