मुंबई | देशात गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच बाबा रामदेव यांनी निरोगी राहण्यासाठी देशवासियांना अनेक उपदेश दिले. रामदेव यांनी पतंजलिची औषधं आणि योग करून कोरोनावर मात करणं शक्य असल्याचा दावा अनेकदा केला आहे. मात्र त्यानंतर त्यांनी अॅलोपॅथी औषध आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यानंतर मात्र देशभरातून त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेक डॉक्टरांनी तर बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळातील व्यक्तींकडूनही रामदेव यांंच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
अभिनेत्री आणि शिवसेना नेता उर्मिला मातोंडकरने रामदेव बाबांना सोशल मीडियावरून फटकारलं आहे. उर्मिलाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट पोस्ट केलंय. “कुणीतरी या बिझनेसमनला एखाद्या कोविड रुग्णालयात जायला सांगा. तिथे आपल्या डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कर्ससोबत २४ तास उभं रहा आणि मग ही टरटर करा. हे सर्वात अमानुष, क्रोधास्पद आणि घृणास्पद आहे. हे कुणाचे टूलकिट आहेत? त्यांची एवढी हिंमत कशी झाली?” असं म्हणत उर्मिलाने रामदेव यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
Someone should ask this "Businessman" to go to Any #Covid hospital..stand along with our #Doctor n #frontlineworkers just for 24 hours n then do his "terterter".Most inhuman, enraging n disgusting.Whose #Toolkit is he? How dare he?@drharshvardhan @MoHFW_INDIA #BabaRamdev pic.twitter.com/zWIaP25Di1
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 24, 2021
अॅलोपॅथीसंदर्भातील विधानावरुन वाद…
अॅलोपॅथीच्या विधानावरून रामदेव यांनी सोमवारी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचं रामदेव यांनी जाहीर केलं. रामदेव यांचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. ‘अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधं करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत,’’ असं वक्तव्य रामदेवबाबा यांनी केलं होतं.
याला डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटने’ने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर अॅलोपॅथिक औषधं घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या रामदेवबाबांच्या विधानावरही ‘आयएमए’ने आक्षेप नोंदवला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.