HW News Marathi
महाराष्ट्र

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, संजय राऊतांचा देखील या वृत्ताला दुजोरा

मुंबई | काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज मुंबईत पत्रकारांशी ते संवाद साधत होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जात उर्मिला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. मात्र भेटीची वेळ अद्याप ठरलेली नाही. तर उद्या (१ डिसेंबर) दुपारी ४ वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकर हिने उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिलाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर, त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिलाने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्या उर्मिला मातोंडकर उद्या शिवबंधन हाती बांधणार असे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिमंळातील नव्या तीन मंत्र्यांची पदे धोक्यात

News Desk

जाणून घ्या… कर्जत जामखेडामधून रोहित पवार निवडणूक का लढणार

swarit

लोकांकडून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे

swarit