HW News Marathi
महाराष्ट्र

शिवरायांच्या नावाचा वापर करून फक्त राजकारण केले जाते – संभाजी भिडे

भिडे गुरुजी हे भीमा कोरेगाव या घटनेनंतर सध्या खूप चर्तेत आहेत. तर, भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्त्यावरून अनेकवेळी वाद निर्माण झाले आहेत. असेच काहीसे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी तासगावच्या धारकरयांची गडकोट मोहिमेच्या बैठकीत केले. शिवरायांच्या नावाचा वापर हा केवळ राजकारणासाठी केला जातो. काही राजकारण्यांसाठी शिवराय हे फक्त राजकारणापुरते मर्यादित आहेत व त्यामुळे राज्यातील २८८ आमदार हे बिनकामाचे आहेत असे ते यावेळी म्हणाले. राज्यातील आमदारांना धारेवर धरत शिवरायांच्या नावाचे निव्वळ राजकारण होते अशी सणसणीत टीका शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केली.

शिवरायांचे स्मारक बांधण्याबाबत भिडे यांनी राज्यातील आमदारांवर टीका केली असून यामध्ये भाजपचे खासदार संजय पाटील यांचावर निशाणा साधण्यात आला आहे. पाटील हे स्वतः मराठा असून कधीच ते शिवरायांच्या स्मारकाबत बोलत नाहीत व त्यासाठी कुठलाही पुढाकार घेत नाही. पाटील यांना जर शिवरायांप्रती आदर असेल तर ते काही नाही उपोषणासाठी बसत स्मारकासाठी पुढाकार घेत. यावरून निव्वळ शिवरायांच्या नावाचा वापर करून राजकारण केले जाते व त्यासाठी राज्यातील २८८ आमदार हे जबाबदार आहेत.

शिवाजी महाराज यांनी केलेल्या कामगिरी बाबत जागरूक राहून काम केले पाहिजेल ना की त्यांच्या नावाचे राजकारण केले पाहिजेल. आपला देश हा आतंकवाद व दहशदवाद यांच्या भोवऱ्यात सापडला असून आपल्या देशाला यांपासून मुक्त करण्यासाठी शिवरायांची शिकवण आमलांत आणली जात नाही तर असे न होता त्यांची विचारधारा जाणून घेतली पाहिजेल. भिडे गुरुजी यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील आमदारांची चांगलीच गोची होणार आहे तर,

तर, खासदार संजय पाटील हे भिडेंच्या या वक्तव्यावर कशाप्रकारे प्रतिक्रिया देतील हे नक्कीच पाहता येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

News Desk

भीमा-कोरेगावाचा तपास मी केंद्राकडे देणार नाही !

swarit

रामदास आठवलेंची भूमिका मराठी भाषेविरूद्ध?

News Desk
मुंबई

जातीय सलोखा वाढवण्यासाठी जमाते इस्लामीची मोहिम, कोरेगाव भीमाला भेट देणार

News Desk

मुंबई : समाजातील प्रत्येताच्या हितासाठी राज्यात व देशात शांतता प्रस्थापित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कोरेगाव भीमा येथील प्रकरणानंतर राज्यातील जातीय सलोखा वाढवण्यासाठी व शांततेसाठी न्यायाच्या लढाईमध्ये सोबत राहण्याची ग्वाही जमात ए इस्लामी तर्फे बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. जमात तर्फे 12 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत शांती व सद्भावनेसाठी मोहिम राबवण्यात येणार आहे. इस्लाम, विकास व शांती या विषयावर यामध्ये प्रबोधन करण्यात येईल, अशी माहिती जमात ए इस्लामी चे राज्याचे सचिव अस्लम गाझी यांनी दिली.

यावेळी डॉ सलीम खान, हुमायुन शेख, हफीजुल्ला फारुकी, इम्तियाज शेख, मुजीब आदिल व पदाधिकारी उपस्थित होते. मराठा व दलित समाजामध्ये याबाबत मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोरेगाव भीमा येथे जाण्याचा मनोदय यावेळी जाहीर करण्यात आला.

जमात च्या या मोहिमेमध्ये जमैतुल उलेमा, सुन्नी समाज या विविध मुस्लिम संघटनांसह बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटना सक्रिय सहभाग घेणार आहेत. या संघटनांना सोबत घेऊन सामाजिक एकात्मतेसाठी किमान समान कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व ऊर्दू अशा चार भाषांमध्ये याबाबत प्रसिध्दीपत्रके प्रकाशित करण्यात आली आहेत. राज्यात सुमारे 20 हजार सक्रिय सभासदांच्या माध्यमातून ही मोहिम राबवण्यात येणार आहे. मुस्लिम समाजाबाबतचे सर्वसामान्य जनतेमधील गैरसमज दूर होण्यास या मोहिमेचा लाभ होईल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती, निराशा व द्वेषभावना समाप्त करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागरण केले जाईल.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे 600 हून अधिक ठिकाणी कार्यक्रम होतील, त्यासाठी 14 लाख पेक्षा जास्त पत्रिकांचे वितरण केले जात आहे. सोशल मीडियावरील विविध साईटच्या माध्यमातून 50 लाख पेक्षा जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असल्याचे जमात तर्फे सांगण्यात आले. या मोहिमेसाठी विशेष वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून समाजातील विविध अनिष्ट प्रथा, स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी अशा अनिष्ट प्रथा रोखण्याचा, जगाला प्रेम व शांतीचा संदेश देण्याचा, सर्व धर्मांच्या व्यक्तींचा जगण्याचा हक्क मान्य करणे, सामाजिक सौहार्द वाढवणे, महिला व बालकांची सुरक्षा करणे, जात-धर्म-वंश-रंग-लिंग यावरून कुणालाही वेगळी वागणूक न देणे असे विविध संदेश देण्यात येणार आहेत.

Related posts

अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

अमेरिकी महिलेच्या कॅमेऱ्याने जगापुढे आणली कामाठीपुराची वस्तुस्थिती,अंडरवर्ल्डचा मोठा अड्डा

News Desk

राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

News Desk