HW News Marathi
मुंबई

मुंबईतील तीन डान्स बारचे परवाने रद्द, पोलिस उपायु्क्त सचिन पाटील

मुंबई | मुंबईतील तीन डान्स बारचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल इंडियाना, अॅरो पंजाब व हॉटेल साईप्रसाद यांचा यामध्ये समावेश आहे. पोलिस उपायुक्त सचिन पाटील यांच्या आदेशाने डान्स बारचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात डान्स बार सुरू करण्याबाबत याचिका सादर करण्यात आली होती. त्यानंतर देण्यात आलेले हे डान्स बारचे परवाने परवाना धारकांचे स्पष्टीकरण ऐकून रद्द करण्यात आले आहेत. पाटील यांच्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ​चौदा पेक्षा जास्त ऑर्केस्टा बारचे परवाने रद्द केले आहेत. 2015 मध्ये एकूण तीन व 2016 मध्ये 2 परवाने रद्द करण्यात आले होते. त्या तुलनेत पाटील यांनी धडाक्याने काम करत जानेवारी 2018 मध्ये 5 ऑर्केस्टा व डान्स बारचे परवाने रद्द करुन दणका दिला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

swarit

केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईत दाखल होणार; उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार

Aprna

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेननप्रमाणे भिडे, एकबोटेवर कारवाई कराः प्रकाश आंबेडकर

News Desk