HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“वापरा आणि फेका ही निती भाजप सर्वत्र वापरतात”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई | “वापरा आणि फेका ही जी काही भाजपची निती आहे. ही निती ते सर्वत्र वापरत आहेत”, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कसबा पोटनिवडणुकीत  महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या विजयानंतर केली आहे. कसबा पोटनिवडणुकीत (Kasba bypoll Results) महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठकारेंनी आज (2 मार्च) पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला.

 

कसब्यात भाजपचा जो पराभव आहे. यामागचे तुम्हाला काय कारण वाटते, असा प्रश्न पत्रकारांनी विचरल्यावर ते म्हणाले, “मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी  दिली नाही. गिरीश बापट यांना प्रचारासाठी आणणे. या सगळ्या गोष्टींचे एकत्रीकरण झालेले आहे. एक तर टिळकांचे घराने, शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझे मनोगत, त्याला मी भाषण नाही म्हणणार.  मी व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मनोगतमध्ये म्हटले होते की, वापरा आणि फेका ही जी काही भाजपची निती आहे. ही निती ते सर्वत्र वापरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेनेबाबत देखील देच केले. जोपर्यंत शिवसेनेची आवश्यकता होती. तोपर्यंत शिवसेनेचा वापर केला. अकाली दलाचा केला, तिकडे ममता, जयललिता सगळ्याबाबती त्यांनी तसे केले. इथे त्यांनी टिळकांच्या घराऱ्यांचा वापर करून त्यांना बाजूला करून टाकले. तो ही राज तिथल्या लोकांच्या मनात होता. यानंतर गिरीश बापट यांच्यासारखा ज्येष्ठ नेता. गिरीश बापटांच्या उमेदीचा काळ मी पाहिलेला आहे. तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे पुण्यात येणे जाणे असायचे. गिरीश बापट हे कसे कार्यकर्ता म्हणून लढत होते. ते सुद्धा बघितले. मी गिरीश बापटांचा फोटो पाहिला त्यांनी ऑक्सिजनच्या नळ्या लावून तुम्ही त्यांना प्रचाराला आणत आहात. तसेच त्यांनी मनोहर पर्रिकरांना आणले होते. मनोहर पर्रिकरांनंतर त्यांच्या मुलाला बाजूला टाकून दिले. ही जी काही वृत्ती आहे ना. तुम्हाला सिलेक्टिव सहानभूती पाहिजे. हे मतदार स्वीकारत नाहीत.”

 

भाजपच्या विरोधातील मतांच्या संख्येत वाढ 

उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपच्या विरोधातील मतांची संख्या ही वाढते. आता ती मते एकत्र करणे, हे मोठे आव्हान आहे. या दोघांच्या मताची बेरीज केली तर ती सुद्धा जागा भाजपच्या विरोधाच निकाल लागला, असेच गृहती धरावे लागले. भाजपच्या विरोधात मतदांनाची संख्या वाढत चाचलेली आहे. मतदार जागृक होत चाललेले आहेत. आता हे आमच्यावरती आहे. एकत्र राहून मतांची बेरीज करणे आणि मतांमध्ये फाटाफू न होऊन देणे हे आता आमच्या सर्वांचे काम आहे.”

 

Related posts

ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत

News Desk

बीडच्या सोनेसांगवी सुर्डी गावात जागेच्या वादावरून अंत्यविधी रोखला

Aprna

धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा! – उपमुख्यमंत्री

Aprna