HW News Marathi
महाराष्ट्र

प्रदूषण रोखण्यासाठी एकतर सुरक्षा उपकरणे लावा, नाहीतर कारखान्यांना टाळे ठोका !

डोंबिवली | गेल्या काही वर्षांत डोंबिवलीत हिरवा पाऊस, लाल पाणी, गणेशमूर्ती काळवंडण्याचे प्रकार प्रदूषणाबाबातील समस्यांचा सामना स्थानिकांना करावा लागत आहे. सध्या डोंबिवली एमआयडीसी फेस २ मध्ये रस्ते गुलाबी झालाआहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (६ फेब्रुवारी) डोबिंवलीतील रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी केली. “प्रदूषण रोखण्यासाठी एकतर सुरक्षा उपकरणे लावा, नाहीतर तुमच्या कारखान्यांना टाळे ठोका,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केमिकल कंपन्यांना दिला.

मुख्यमंत्री म्हणाले की, “रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जुन्या झाल्या असून त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेशही त्यांनी दिले. रासायनिक कारखाने लोकवस्तीला लागून आहेत. त्यामुळे घातक कारखाने लोकवस्तीपासून लांब नेता येतील का?, याची चाचपणी अधिकाऱ्यांनी करावी. यासाठी १५ दिवसांचा अवधी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात त्यांनी बैठक घेतली. तिला पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, आयुक्त गोविंद बोडके, महापौर विनीता राणे आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेची मोठी घोषणा,राजीनामे नामंजूर,पुढची वाटचाल ठरली !

News Desk

मुंबईत शाळा सुरु, एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची संमती आवश्यक!

News Desk

धक्कादायक! डॉक्टरची कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी

News Desk