HW News Marathi
देश / विदेश

भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत, सामनातून भाजपवर टीका

मुंबई | मोदी यांचे म्हणणे दिल्लीच्या मतदारांनी उद्या ऐकले नाही तर लाखो मतदार हे देशद्रोही आहेत असे ठरवून नवे येणारे सरकार ते बरखास्त करणार आहेत काय? एकतर अशा चिखलात देशाच्या पंतप्रधानांनी उतरू नये व उतरलेच आहात तर संयम राखा. राजकारण सगळेच करतात, पण विकासाच्या मुद्दय़ावर फार कमी बोलतात. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सर्जिकल स्ट्राइकचे समर्थन केले तरीही ते पराभूत झाले. याचा अर्थ असा की, लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न वेगळे आहेत. ते सोडवा. त्यावर बोला. दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या ‘फुलोत्पादना’ला आमच्या शुभेच्छा! पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल सगळ्यांना ‘लय भारी’ पडताना दिसत आहेत. दिल्लीचे मतदार सुज्ञ आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही. सामनाच्या अग्रलेखात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कौतुक तर भाजपवर टीका केली आहे.

सामनाचा आजचा अग्रलेख

दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही . भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे . त्यांच्या या नव्या ‘ फुलोत्पादना ‘ ला आमच्या शुभेच्छा ! पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली आहेत . देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे . राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे . एक केजरीवाल सगळ्यांना ‘ लय भारी ‘ पडताना दिसत आहेत . दिल्लीचे मतदार सुज्ञ आहेत . त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही .

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी जिवाची बाजी लावली आहे. महाराष्ट्र हातचे गेले, झारखंडमध्ये दारुण पराभव झाला. त्यामुळे दिल्लीत तरी झेंडा फडकवावा, असे भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर त्यात चुकीचे काय? दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी देशभरातले 200 खासदार, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ कामाला लागले आहे, पण इतके करूनही एक केजरीवाल सगळ्यांना भारी असे चित्र स्पष्ट झाले आहे. केजरीवाल यांच्या भूमिका, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात, पण हाती मर्यादित सत्ता असताना, केंद्राने वारंवार अडथळे आणूनही आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा याबाबतीत त्यांच्या सरकारचे काम आदर्श आहे. केजरीवाल सरकारच्या त्या कार्याचा आदर्श घेऊन पंतप्रधान मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाने हे ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांत राबवायला हरकत नव्हती व त्या कामी केजरीवाल यांच्या ‘व्हिजन’चा वापर देशभर करायला हवा होता, पण प्रचारातील एकतर्फी झोडपेगिरी आणि उटपटांगगिरी इतक्या थराला पोहोचली की इतर विषय राहिले बाजूला, केजरीवाल यांनाच खोटे ठरविण्यासाठी सारी यंत्रणा राबवली जात आहे. एखाद्या राज्यात कुणी चांगले काम करीत असेल व ते राज्य आपल्या विचाराचे नसेल तरीही चांगल्याला चांगले म्हणणे व ते चांगले काम पुढे घेऊन जाणे हेच देशाच्या लोकनायकाचे कर्तव्य असते. पण ही मनाची दिलदारी आज उरलीय कुठे? दिल्लीची राजकीय व्यवस्था ही केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. दिल्लीतील महानगरपालिका भाजपच्या मुठीत आहे. केंद्राच्या वतीने नायब राज्यपाल दिल्लीचा कारभार पाहतात. म्हणजे लोकनियुक्त सरकारला टपल्या मारतात. अशा परिस्थितीत

एखादे सरकार काम करते

नागरी सुविधांच्या बाबतीत कीर्तिमान प्रस्थापित करते हे महत्त्वाचे. आमचे राज्यकर्ते अमेरिका, फ्रान्स, युरोपादी राष्ट्रांतील एखाद्या व्यवस्थेने प्रभावित होऊन ते ‘मॉडेल’ हिंदुस्थानात राबवतील, त्याचा डांगोरा पिटतील, पण दिल्लीतील सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या याचे कौतुक करताना त्यांच्या पोटात सर्जिकल स्ट्राइकचा गोळा का उठावा तेच कळत नाही. गरीबांची पोरं दिल्लीतील सरकारी शाळांत शिकतात व त्या शाळा आदर्श ठरल्या. मोहल्ला क्लिनिक योजना उत्तम काम करतात. पाणी, वीज बिले माफ झाली किंवा अर्ध्यावर आली याचा अर्थ पाच वर्षांपूर्वी केजरीवाल यांनी जी वचने दिली ती पूर्ण झाली व त्याबद्दल श्री. मोदी किंवा श्री. शहा यांनी केंद्रीय सरकारतर्फे केजरीवाल यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कारच करून नवा पायंडा पाडायला हवा. पण ते न करता भाजपचे बडे नेते व मंत्री दिल्लीत निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू विरुद्ध मुसलमान असा राजकीय चिखल तुडवीत बसले आहेत. भाजपवाल्यांचा केजरीवाल विरोध एवढा टोकाचा आहे की, त्यांना त्यांची हनुमान भक्तीही पसंत नाही. झाले असे की भाजपवाले जसे रामभक्त आहेत तसे केजरीवाल हनुमानभक्त आहेत. ते शनिवारी हनुमान मंदिरात गेले आणि तेथे त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. मात्र भाजपला ते आवडले नाही. एवढेच नव्हे तर हे सर्व ढोंग आहे अशी आगपाखड त्यांनी केली. खरे तर श्रीरामाशिवाय हनुमान अपूर्ण आहे आणि ढोंगाबाबतच बोलायचे तर त्याबाबत कोणी कोणाला शिकवू नये. ‘हमाम में सब ढोंगी है’ अशीच सध्या एकूण राजकारणाची स्थिती आहे. ‘केजरीवाल हे आतंकवादी आहेत’ असादेखील भाजपचा प्रचाराचा मुद्दा आहे. ते आतंकवादी असल्याचे

पुरावे असतील तर

सरकार हात चोळत का बसले आहे? कारवाई करायला हवी.

2014 साली दिल्लीच्या 70 टक्के मतदारांनी केजरीवाल यांना म्हणजे आतंकवाद्याला मतदान केले असे भाजपला म्हणायचे आहे काय? पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार सभांचे मुद्दे तरी काय? बाटला हाऊस आणि कलम 370. भारतीय जनता पक्षाने देशाच्या पंतप्रधानांना इतके खाली आणू नये. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागणाऱ्यांना मतदानातून शिक्षा करा. मोदी यांचे म्हणणे दिल्लीच्या मतदारांनी उद्या ऐकले नाही तर लाखो मतदार हे देशद्रोही आहेत असे ठरवून नवे येणारे सरकार ते बरखास्त करणार आहेत काय? एकतर अशा चिखलात देशाच्या पंतप्रधानांनी उतरू नये व उतरलेच आहात तर संयम राखा. राजकारण सगळेच करतात, पण विकासाच्या मुद्दय़ावर फार कमी बोलतात. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सर्जिकल स्ट्राइकचे समर्थन केले तरीही ते पराभूत झाले. याचा अर्थ असा की, लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न वेगळे आहेत. ते सोडवा. त्यावर बोला. दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या ‘फुलोत्पादना’ला आमच्या शुभेच्छा! पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल सगळ्यांना ‘लय भारी’ पडताना दिसत आहेत. दिल्लीचे मतदार सुज्ञ आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानकडून पुन्ह एकदा शस्त्रसंधी उल्लंघन, दोन जवान शहीद

News Desk

आनंदवार्ता ! मान्सून केरळमध्ये दाखल

News Desk

कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे संशोधन नाही, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

News Desk