HW News Marathi
Covid-19

आम्हालाही बाहेरच्या राज्यातील मजुरांसाठी नियम बनवावे लागतील !

मुंबई | आम्हालाही बाहेरच्या राज्यातील मजुरांसाठी नियम बनवावे लागतील, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लागावला. महाराष्ट्र सरकार जिंदाबाद, अशा घोषणा करत गेले. ही व्हिडीओक्लिप्स आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवले. योगींना ते कदाचित आवडले नसेल, राऊत यांनी म्हणाले. राऊत यांनी आज (२५ मे) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडले.

“उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचे असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल”, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. याला राऊत यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, “आम्हालाही बाहेरच्या राज्यातील मजुरांसाठी नियम बनवावे लागतील. सगळ्यांना पारखून घ्यावे लागेल,”

“अनेक राज्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कारण त्यांच्या भागातील कामगारांची काळजी महाराष्ट्र सरकारने उत्तम पद्धतीने घेतली. याचे त्यांनी कौतुक केले. उदिसाचे नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सर्वांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारी यंत्रणेचे आभार मानले”, असे संजय राऊत म्हणाले. “राज्य सरकार हे विरोधी पक्षातील सरकार आहे, असा विचार करु नये. महाराष्ट्राला राज्याच्या नजरेने पाहिले तर यादींचा प्रश्न येणार नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्राचेच केंद्रातले मंत्री यादी मागत आहेत. याचे आश्चर्य आणि खेद वाटतो”, असे ते यावेळी म्हणाले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची औषधं आणि लसीवर GST कर गरजेचा, नाहीतर किंमत वाढेल- निर्मला सीतारामन

News Desk

स्थलांतरितांसाठी विशेष रेल्वेने प्रवासाची केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची परवानगी

News Desk

नवाब मालिकांचे पालकमंत्रीपद दुसऱ्या एखादया कार्यक्षम व्यक्तीला द्या ! बच्चू कडूंच्या पक्षाची मागणी

News Desk