HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना उत्तर प्रदेश पंचायत निवडणुका लढवणार, काँग्रेसकडे मागणार मदतीचा ‘हात’?

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) आणि अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षानंतर आता शिवसेनाही आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल मानल्या जाणार्‍या पंचायत निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. यासाठी अनेक राजकीय पक्ष तयारीमध्ये गुंतले आहेत.

शिवसेनेचे उत्तर प्रदेश प्रदेश प्रमुख अनिल सिंह म्हणाले की, पंचायत निवडणुकीसाठी जिल्हावार आढावा घेऊन पक्षाच्या वतीने प्रभारी नियुक्त केला जात आहे. सर्व जिल्ह्यांमधून अर्ज मागविण्यात येत आहेत. याशिवाय शिवसेनेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देणार आहे.

निवडणूक व्यवस्थापनाची माहिती जाणून घेण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात येणार आहे. हे लोक सुमारे एक आठवडा मुक्काम करतील. शिवसेना बीएमसी व ग्रामीण भागात कशी कार्यरत आहे, हे शिकवण्यात येणार आहे. तेथून परत आल्यानंतर पूर्वांचल, पश्चिम बंडल विभागात प्रशिक्षण होईल. यानंतर उमेदवारांची निवड करुन त्यांना मैदानात उतरवले जाईल. दरम्यान, काँग्रेसशी चर्चा झाल्यास त्यांच्याशी युती केली जाणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदारांची साद अन् अजित पवारांचा प्रतिसाद, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यासाठी मोठी घोषणा

News Desk

राज्यात दिवसभरात ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त १५८ रूग्णांचा मृत्यू!

News Desk

भ्रष्टाचार करणाऱ्याला तर देवेंद्र फडणवीसांनी जोड्यांनी मारले पाहिजे!

Aprna