HW News Marathi
Covid-19

“लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून लसीकरण केलं म्हणजे उपकार नाही”, रोहित पवारांची टीका

मुंबई। कोरोनाच्या या संकटाला थोपवण्यासाठी लसीकरणावर अधिक भर दिला जातोय १८ वर्षांवरील सर्वांना केंद्र सरकारतर्फे मोफत कोरोना लस देण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार असा उल्लेख असलेला फलक लावण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून केलं जाणारं लसीकरण म्हणजे उपकार नाही तर कोणत्याही सरकारचं कर्तव्य आहे. पण मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्याची युजीसीची सूचना आश्चर्यकारक आहे. कदाचित ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही माहीत नसेल, असं म्हणत रोहित पवार यांनी युजीसीवर टीका केली.

यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्याबाबतचा फलक लावण्याचे निर्देश देतानाच हे फलक समाजमाध्यमांमध्येही प्रसारित करण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, या संदेशासोबतच्या चित्रामध्ये ‘धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असं लिहिलं आहे. यूजीसीच्या या सूचनेवरून शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी संघटना आणि काही राजकीय पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अनेक विद्यार्थी संघटनेनं याला आता तीव्र विरोध केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुखमहंत नृत्यगोपाल दास कोरोना पॉझिटिव्ह !

News Desk

राहूल गांधी यांना कोरोनाची लागण

News Desk

महाराष्ट्रात आज ३००७ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk