HW News Marathi
Covid-19

सिरमची लवकरच लहान मुलांसाठी कोरोना लस होणार उपलब्ध!

नवी दिल्ली। पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) कोरोनावरील कोव्होव्हॅक्स लशीचे उत्पादन करीत आहे. या लशीने परिणामकारकतेत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला मागे टाकले आहे. ही लस सप्टेंबर मध्ये उपलब्ध होणार असून या लशीची चाचणी लहान मुलांवरही केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

कोव्होव्हॅक्स लस नोव्होवॅक्स या अमेरिकेतील कंपनीसोबत सिरम तयार करीत आहे. नोव्होवॅक्सच्या लशीची लहान मुलांसाठी जुलैपासून चाचणी सुरू करणार आहेत. म्हणून आता लहान मुलांसाठी सिरम ची कोरोना लस लवकरच मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले असून, ही ९० टक्के प्रभावी सांगण्यात येते.

कोव्होव्हॅक्स लशीच्या प्रौढांसाठीच्या चाचण्या शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. सिरमकडून ही लस सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होईल. आणि मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नोव्होवॅक्स कंपनीने कोव्होव्हॅक्स लशीच्या उत्पादनासाठी करार केला होता. भारतात लशीच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्या तरी जागतिक पातळीवर झालेल्या चाचण्यांच्या आधारे या लशीच्या मंजुरीसाठी अर्ज करता येतो. अशी माहिती सिरम चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी फोन करून मुरलीधर मोहोळ यांची केली विचारपूस

News Desk

२३ जुलैपासून पुणेकरांना मिळणार लॉकडाऊनमधून दिलासा !

News Desk

कर्जाच्या हप्त्याची वसुली पुढचे ३ महिने स्थगित करा ,RBI चा बॅंकांना सल्ला

Arati More