HW News Marathi
Covid-19

‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ लसीच्या चाचणीला तात्पुरती स्थगिती

पुणे | जगभराचे डोळे लागलेल्या कोरोना विषाणूवरील लशीच्या पुण्यातील चाचणीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड १९ लशीची चाचणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पुण्यात सुरु असलेल्या चाचणीत सहभागी व्यक्तीवर संशयास्पद प्रतिकूल परिणाम दिसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनी AstraZeneca Plc ची ही लस संपूर्ण जगासाठी एक आनंदवार्ता देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भारतातही या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवेळी एका व्यक्तीला लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडली असून काही दुष्परिणाम जाणवले. या व्यक्तीला रुग्णालयातही दाखल करावं लागलं.

या व्यक्तीला नेमका काय त्रास होत आहे याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने प्रकृती लवकर बरी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. करोना लसीच्या चाचणीदरम्यान तिला थांबवणं नवीन गोष्ट नाही, पण यामुळे जगभरात लवकरात लवकर करोना लस उपलब्ध होण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि AstraZeneca Plc ची ही लस स्पर्धेत सर्वात पुढे होती.

ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात २०२१ च्या सुरुवातील लस उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली होती. भारतासहित जगभरातून ही लस मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर येण्यास सुरुवात झाली होती. करोनामुळे जगभरात आतापर्यंत ८ लाख ९४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान AstraZeneca Plc च्या प्रवक्त्यांनी लस दिलेल्या व्यक्तीच्या आजाराचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे.

जेव्हा एखाद्या चाचणीमध्ये संभाव्य अज्ञात आजार दिसतो, तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात. मात्र आम्ही या चाचणीची अखंडता टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करु” असेही ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. डिसेंबरपर्यंत कोट्यवधी डोसची निर्मिती होईल. भारतामध्ये डिसेंबरमध्ये या लसीची परवाना प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर डिसेंबरमध्ये लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचं सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजीव ढेरे यांनी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गरीब, कष्टकरी व मजूरांचा घरी जाण्याचा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार

News Desk

राज्यात आज २१,०२९ नव्या कोरोना रुग्णांची भर

News Desk

सांगलीतील १२ जणांना कोरोनाची लागण,जिल्ह्यात कोरोनाचे २३ रूग्ण !

Arati More